Marathi Hymns Lyrics

नमो स्वर्गाच्या स्वामिनी

      नमो स्वर्गाच्या स्वामिनी, मारिया । तू  चंद्ररूपी  देखणी,
मारिया । राख आम्हाला  प्रेमाने । तार आम्हाला कृपेने

ध्रु     चरणी  येतो  विस्वाशी  बसतो  । का तू पांप्यास  त्यागित  नाहीस, मारिया

      नमो पृथ्वीच्या  स्वामिनी ।  ख्रिस्तांच्या  हे  मध्यस्तिनी , मारिया
हो पुत्राशी  कैवारीण । पाड  कृपा  आम्हावरी.


आभार तुझे  येशू

१     आभार तुझे  येशू (३)  मनापासूनी
आभार तुझे  येशू  (२)  आभार मानतो मनापासूनी

२     तुजवर प्रेम  मी करीन (३)  मनापासूनी
तुजवर प्रेम  मी  करीन (२) प्रेम  मी  करीन मनापासूनी

३     तुझा  गौरव  करीन (३)  मनापासूनी
तुझा  गौरव  करीन (२)  गौरव  करीन मनापासूनी


हम बोले
घृ    हम बोले प्रभू  येशू नाम  जय येशू  जय नाम

१     दयानिदान  प्रभू येशू  नाम । जय येशू  जय नाम
२     मंगलमय  प्रभू येशू  नाम । जय येशू  जय नाम
३     पाप  निवारक येशू  नाम । जय येशू  जय नाम


मरिया तुला प्रणाम

घृ  मरिया तुला  प्रणाम

१     तू नारी रत्नां मधि धन्य ।  तुझा पुत्र येशू  गे धन्य ।  कृपा पूर्ण
तू अमला  नारी । प्रभुचे  सुंदर धाम.

२     परमेशाचे  मरियम  माते  । विनंती  कर  आम्हास्तव वनिते
आज आणि  त्या  क्षणी  जेधवा ।  घेऊ चिर  विश्राम


तुज  सोडुनी,  ख्रिस्ता

घृ  तुज   सोडुनी,  ख्रिस्ता, जाउ  कुठे  मी, जाउ  कुठे  मी राहू  कुठे ?

१     विरह  तुझा  रे नरक  भयंकर  भासे प्रलयानल पेटे ।
२     धर्मरवी  तू क्षणभर नसता  मम हृदयात  तम  दाटे ।
३     तुज वाचुनिया मार्ग जगी ह्या मज दिसती  तितुके  खोटे ।
४     पापी नटखट मी, मज माझे तुजविण भारी भय  वाटे ।
५     उलटे मन्मन तुजविण दुसरा  कोण  जगी  ह्या  करी  सुलटे ।
६     मम जीवन तू , जगदुध्दारा, मेलोसे तुजवीण  वाटे ।
७     सहवासाहुन मला तुझ्या  रे  स्वर्गाचे  सुख  नच  मोठे ।

mobile

©2018Vasaiker.com